पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रणेते नवोन्मेषकार आणि उद्योगपती टीपीजी नांबियार जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. टीपीजी नांबियार जी भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे प्रबळ समर्थक होते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
"श्री टीपीजी नांबियारजी हे एक प्रणेते नवोन्मेषकार आणि उद्योगपती होते. भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे ते प्रबळ समर्थक होते. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो.”
Shri TPG Nambiar Ji was a pioneering innovator and industrialist, who was a strong votary of making India economically strong. Pained by his passing away. Condolences to his family and admirers.
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2024