नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातामुळे बाधित झालेल्यांना भारतीय दूतावास सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख वाटले. शोकग्रस्त कुटुंबियांप्रति सहवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो. अपघातामुळे बाधित झालेल्यांना भारतीय दूतावास सर्वतोपरी सहाय्य करत आहे.”
Saddened by the loss of lives due to a road mishap in Tanahun district, Nepal. Condolences to the bereaved families. May the injured recover at the earliest. The Indian Embassy is providing all possible assistance to those affected.
— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2024