पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर महामहिम ओलाफ शोल्झ यांच्यासोबत व्यापार विषयक गोलमेज बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
भारतात, सरकार करत असलेल्या व्यापक सुधारणांवर भर देत देशात मोठ्या संख्येने वाढत असलेल्या नवउद्यम (स्टार्ट अप्स) आणि युनिकॉर्नकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्योग प्रमुखांनी भारतातील प्रतिभावान तरुणाईत गुंतवणूक करावी असे निमंत्रणच त्यांनी दिले.
या कार्यक्रमात सरकारचे उच्चाधिकारी आणि दोन्ही बाजूंचे निवडक मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले. त्यांनी हवामान विषयक सहकार्य, वितरण साखळ्या; संशोधन आणि विकास या विषयांवर चर्चा केली;
खालील उद्योग प्रमुखांनी व्यापार विषयक गोलमेज बैठकीत भाग घेतला:
भारतीय व्यापार शिष्टमंडळ:
- संजीव बजाज (भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख) अध्यक्ष, सीआयआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बजाज फिनसर्व्ह;
- बाबा एन कल्याणी : अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज;
- सी के बिर्ला : व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी , सी के बिर्ला समूह;
- पुनीत छटवाल : व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड;
- सलील सिंघल : अध्यक्ष एमेरिटस, पीआय इंडस्ट्रीज;
- सुमंत सिन्हा : अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रिन्यू पॉवर आणि अध्यक्ष, असोचाम;
- दिनेश खारा : अध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया;
- सी पी गुरनानी : व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, टेक महिंद्रा लिमिटेड;
- दीपक बागला : मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, इन्व्हेस्ट इंडिया;
जर्मन व्यापार शिष्टमंडळ:
- रोलँड बाश : जर्मन शिष्टमंडळाचे प्रमुख, अध्यक्ष आणि सीईओ, सीमेन्स आणि अध्यक्ष, जर्मन व्यापार आशिया पॅसिफिक समिती;
- मार्टिन ब्रुडरमुलर: कार्यकारी संचालक मंडळ अध्यक्ष, बीएएसएफ;
- हर्बर्ट डायस: व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष, फोक्सवॅगन;
- स्टीफन हार्टुंग : व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष, बॉश;
- मारिका लुले: मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, जीएफटी टेक्नॉलॉजीज;
- क्लॉस रोसेनफेल्ड: मुख्य कार्यकारी अधिकारी, शेफलर;
- ख्रिस्टियन स्वेवींग: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉइश बँक;
- राल्फ विंटरगर्स्ट, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष,
- गीसेके अॅन्ड डेव्हरीएन्ट
- जर्गेन झेश्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, एनेरकॉन;