पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आभासी माध्यमातून आयोजित 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
ब्रिक्स@15: सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य ही भारताने निवडलेली शिखर परिषदेची संकल्पना होती.
या शिखर परिषदेत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा हे अन्य सर्व ब्रिक्स नेते सहभागी झाले होते.
यावर्षी भारताच्या अध्यक्षते दरम्यान ब्रिक्स भागीदारांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ज्यामुळे अनेक नवीन उपक्रम साध्य झाले.यात पहिली ब्रिक्स डिजिटल आरोग्य शिखर परिषद; बहुपक्षीय सुधारणांवरील पहिले ब्रिक्स मंत्रीस्तरीय संयुक्त निवेदन; ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती आराखडा ; रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या क्षेत्रातील सहकार्यावरील करार; आभासी ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र; हरित पर्यटनाबाबतची ब्रिक्स आघाडी इत्यादींचा यात समावेश आहे.
कोविड पश्चात जागतिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ब्रिक्स देश महत्वाची भूमिका बजावू शकतात हे प्रामुख्याने अधोरेखित करत पंतप्रधानांनी ;'लवचिक , नाविन्यपूर्ण , विश्वासार्ह आणि शाश्वत पुर्नउभारणी' या ब्रीदवाक्याखाली ब्रिक्स सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.
या संकल्पनेवर विस्ताराने बोलताना पंतप्रधानांनी, लसीकरणाची गती आणि सुलभता वाढवून 'पुर्नउभारणी' वाढवण्याच्या गरजेवर, विकसित देशांच्या पलीकडे औषध निर्माण आणि लस उत्पादन क्षमता वैविध्यपूर्ण करून 'लवचिकता' निर्माण करणे, सार्वजनिक हितासाठी डिजिटल साधनांचा कल्पकतेने वापर करून 'नवोन्मेषा'ला प्रोत्साहन देणे,विश्वासार्हता' वाढवण्यासाठी बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा सुनिश्चित करणे आणि पर्यावरण आणि हवामानाच्या समस्यांवर ब्रिक्सचा एकमुखी आवाज स्पष्ट करून 'शाश्वत' विकासाला प्रोत्साहन देणे यावर भर दिला.
या नेत्यांनी अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींसह महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर चर्चा केली. दहशतवाद आणि कट्टरतावाद वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल या परिषदेत समान मते मांडण्यात आली आणि दहशतवादविरोधी ब्रिक्स कृती आराखड्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी सर्व ब्रिक्स भागीदारांनी सहमती दर्शवली.
शिखर परिषदेच्या समारोपाच्यावेळी नेत्यांनी 'नवी दिल्ली घोषणापत्र ' स्वीकारले.
पिछले डेढ़ दशक में ब्रिक्स ने कई उपलब्धियां हासिल की हैं।
— PMO India (@PMOIndia) September 9, 2021
आज हम विश्व की उभरती अर्थव्यवस्थाओं के लिए एक प्रभावकारी आवाज़ है।
विकासशील देशों की प्राथमिकताओं पर ध्यान केन्द्रित करने के लिए भी यह मंच उपयोगी रहा है: PM @narendramodi
हमें यह सुनिश्चित करना है कि ब्रिक्स अगले 15 वर्षों में और परिणामदायी हो।
— PMO India (@PMOIndia) September 9, 2021
भारत ने अपनी अध्यक्षता के लिए जो थीम चुना है, वह यही प्राथमिकता दर्शाता है - “BRICS at 15: Intra-BRICS Cooperation for Continuity, Consolidation and Consensus”: PM @narendramodi
यह भी पहली बार हुआ कि BRICS ने “Multilateral systems की मजबूती और सुधार” पर एक साझा position ली।
— PMO India (@PMOIndia) September 9, 2021
हमने ब्रिक्स “Counter Terrorism Action Plan” भी अडॉप्ट किया है: PM @narendramodi
हाल ही में पहले “ब्रिक्स डिजिटल हेल्थ सम्मेलन” का आयोजन हुआ। Technology की मदद से health access बढ़ाने के लिए यह एक innovative कदम है।
— PMO India (@PMOIndia) September 9, 2021
नवंबर में हमारे जल संसाधन मंत्री ब्रिक्स फॉर्मेट में पहली बार मिलेंगे: PM @narendramodi