BRICS platform has witnessed several achievements in the last one and a half decades: PM Modi
Today we are an influential voice for the emerging economies of the world: PM Modi at BRICS Summit
BRICS has created strong institutions like the New Development Bank, the Contingency Reserve Arrangement and the Energy Research Cooperation Platform: PM
We have adopted the BRICS Counter Terrorism Action Plan: PM Modi at BRICS virtual Summit

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आभासी माध्यमातून आयोजित 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

ब्रिक्स@15: सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य ही भारताने निवडलेली  शिखर परिषदेची संकल्पना होती.

या शिखर परिषदेत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा हे अन्य सर्व ब्रिक्स नेते सहभागी झाले होते.

यावर्षी भारताच्या अध्यक्षते दरम्यान ब्रिक्स भागीदारांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.  ज्यामुळे अनेक नवीन उपक्रम साध्य झाले.यात पहिली ब्रिक्स डिजिटल आरोग्य शिखर परिषद; बहुपक्षीय सुधारणांवरील पहिले ब्रिक्स मंत्रीस्तरीय संयुक्त निवेदन; ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती आराखडा ; रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या क्षेत्रातील सहकार्यावरील करार; आभासी ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र; हरित पर्यटनाबाबतची  ब्रिक्स आघाडी इत्यादींचा यात समावेश आहे.

 कोविड पश्चात  जागतिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ब्रिक्स देश महत्वाची भूमिका बजावू शकतात हे प्रामुख्याने अधोरेखित करत पंतप्रधानांनी ;'लवचिक , नाविन्यपूर्ण , विश्वासार्ह आणि शाश्वत पुर्नउभारणी' या ब्रीदवाक्याखाली ब्रिक्स सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.

या संकल्पनेवर विस्ताराने बोलताना पंतप्रधानांनी,  लसीकरणाची गती आणि सुलभता वाढवून 'पुर्नउभारणी' वाढवण्याच्या गरजेवर, विकसित देशांच्या पलीकडे औषध निर्माण  आणि लस उत्पादन क्षमता वैविध्यपूर्ण करून 'लवचिकता' निर्माण करणे, सार्वजनिक हितासाठी डिजिटल साधनांचा कल्पकतेने वापर करून 'नवोन्मेषा'ला प्रोत्साहन देणे,विश्वासार्हता' वाढवण्यासाठी बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा सुनिश्चित करणे आणि पर्यावरण आणि हवामानाच्या समस्यांवर ब्रिक्सचा एकमुखी आवाज स्पष्ट करून 'शाश्वत' विकासाला  प्रोत्साहन देणे यावर भर दिला.

या नेत्यांनी अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींसह महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर चर्चा केली. दहशतवाद आणि कट्टरतावाद वाढल्यामुळे  निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल या परिषदेत समान मते मांडण्यात आली आणि दहशतवादविरोधी ब्रिक्स कृती आराखड्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी सर्व ब्रिक्स भागीदारांनी सहमती दर्शवली.

शिखर परिषदेच्या समारोपाच्यावेळी नेत्यांनी 'नवी दिल्ली घोषणापत्र ' स्वीकारले. 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Income inequality declining with support from Govt initiatives: Report

Media Coverage

Income inequality declining with support from Govt initiatives: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella meets Prime Minister, Shri Narendra Modi
January 06, 2025

Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella met with Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi.

Shri Modi expressed his happiness to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. Both have discussed various aspects of tech, innovation and AI in the meeting.

Responding to the X post of Satya Nadella about the meeting, Shri Modi said;

“It was indeed a delight to meet you, @satyanadella! Glad to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. It was also wonderful discussing various aspects of tech, innovation and AI in our meeting.”