कतारच्या अधिकृत दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दोहा येथे आगमन झाले. पंतप्रधानांची ही दुसरी कतार भेट आहे, याआधी जून 2016 मध्ये पंतप्रधानांनी कतारला भेट दिली होती.
कतारचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री सुलतान अल-मुरैकी यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले.
दोन दिवसीय कतार भेटीदरम्यान, आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान आज, 15 फेब्रुवारी रोजी, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट घेणार असून त्यावेळी ते द्विपक्षीय तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील.
Landed in Doha. Looking forward to a fruitful Qatar visit which will deepen India-Qatar friendship. pic.twitter.com/h6QHKpqYcm
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2024