आतापर्यंतचे सर्वाधिक पेटंट 2023-24 मध्ये मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या एक्सवरील संदेशाच्या प्रतिसादात पंतप्रधान म्हणाले;
"नवोन्मेषभिमुख ज्ञान अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपल्या प्रवासातील एक मैलाचा दगड असलेले हे एक उल्लेखनीय यश आहे. भारतीय युवकांना अशा प्रगतीचा मोठा लाभ होईल ".
This is a notable feat, marking a milestone in our journey towards an innovation-driven knowledge economy. India’s youth will be great beneficiaries of such strides. https://t.co/IQ6IJIYrBZ
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2023