Quoteअटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रबळ इच्छेमुळे झारखंड राज्य अस्तित्वात आले असे सांगत पंतप्रधानांनी वाजपेयी यांना वाहिली आदरांजली
Quote“स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, हा देश भारतातील आदिवासी परंपरा आणि त्यांच्या शौर्याच्या कहाण्यांना अधिक अर्थपूर्ण आणि अधिक मोठी ओळख प्राप्त करून देईल असा निर्णय देशाने घेतला आहे”
Quote“हे वस्तुसंग्रहालय आदिवासी शूरवीर आणि वीरांगनांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणारे आपल्या वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृतीचे जितेजागते ठिकाण होईल”
Quoteभगवान बिरसा समाजासाठी जगले, त्यांची संस्कृती आणि त्यांच्या देशासाठी त्यांनी त्यांचे प्राण अर्पण केले. म्हणून ते आपले पूज्यस्थान; म्हणून आपल्या विश्वासात, आपल्या उर्जेत अजूनही जिवंत आहेत”

भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. झारखंडचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

|

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, भारतातील आदिवासी परंपरा आणि त्यांच्या शौर्याच्या कहाण्यांना हा देश अधिक अर्थपूर्ण आणि अधिक मोठी ओळख प्राप्त करून देईल असा निश्चय  आपल्या देशाने केला आहे “याकरिता, आजपासून दरवर्षी आपला देश भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असलेला 15 नोव्हेंबर हा दिवस ‘आदिवासी गौरव दिवस’ म्हणून साजरा करेल असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे,” असे या ऐतिहासिक प्रसंगी देशाला शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी सांगितले.

ज्यांच्या प्रबळ इच्छेमुळे झारखंड राज्य निर्माण झाले त्या अटल बिहारी वाजपेयी यांना देखील पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. “देशाच्या सरकारमध्ये स्वतंत्र आदिवासी मंत्रालयाची निर्मिती करून देशाच्या धोरणांना आदिवासी समाजाच्या हिताशी जोडण्याचे काम सर्वप्रथम अटलजी यांनी केले,” असे त्यांनी पुढे सांगितले.

|

भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाच्या निर्मितीबद्दल पंतप्रधानांनी आपल्या देशातील आदिवासी समुदाय आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “हे वस्तुसंग्रहालय आदिवासी शूरवीर आणि वीरांगनांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणारे आपल्या वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृतीचे जितेजागते ठिकाण होईल.”

भगवान बिरसा यांच्या दूरदृष्टीबद्दल बोलताना, आधुनिकतेच्या नावाखाली आपली विविधता, प्राचीन ओळख आणि निसर्ग यांचे नुकसान करणे समाजाच्या हिताचे नाही हे भगवान बिरसा जाणून होते याकडे पंतप्रधान यांनी निर्देश केला. मात्र याचवेळी बिरसा आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांच्या समाजातील कमतरता आणि वाईट गोष्टींबद्दल आवाज उठविण्याचे धैर्य त्यांच्यात होते असे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले कि भारतासाठीचे निर्णय घेण्याची शक्ती भारतीयांच्या हाती सोपविणे  हेच स्वातंत्र्य चळवळीचे लक्ष्य होते. मात्र त्याचवेळी, धरती आबा म्हणून प्रसिध्द असलेल्या मुंडा यांनी भारतातील आदिवासी समाजाची ओळख पुसून टाकण्याची इच्छा असणाऱ्या विचारधारेविरुद्ध देखील त्यांचा लढा सुरु होता. भगवान बिरसा समाजासाठी जगले, त्यांची संस्कृती आणि त्यांच्या देशासाठी त्यांनी त्यांचे प्राण अर्पण केले. म्हणूनच ते आपले पूज्यस्थान  म्हणून आपल्या विश्वासात, आपल्या उर्जेत अजूनही जिवंत आहेत” “धरती आबा या पृथ्वीवर फार काळ राहिले नाहीत. पण त्यांच्या छोट्या जीवनकाळात त्यांनी देशासाठी अख्खा इतिहास लिहिला आणि भारतातील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले.” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

|
|

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • Mahendra singh Solanki Loksabha Sansad Dewas Shajapur mp November 14, 2023

    नमो नमो नमो नमो नमो नमो
  • Laxman singh Rana June 20, 2022

    नमो नमो 🇮🇳🌷
  • Laxman singh Rana June 20, 2022

    नमो नमो 🇮🇳
  • DR HEMRAJ RANA February 16, 2022

    धनि कबीर धनि वो सत् गुरु, जिन परम तत् लखाया। कहै रविदास सुनो हो स्वामी, मैं शरण तुम्हारी आया।। काशी में जन्मे भक्तिकालीन कवि व अपनी वाणियों के माध्यम से वर्णभेद,जातिभेद एवं सांप्रदायिकता का विरोध करने वाले संत श्री #रविदास जी की जन्म जयंती पर सादर प्रणाम। #RavidasJayanti2022

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India eyes potential to become a hub for submarine cables, global backbone

Media Coverage

India eyes potential to become a hub for submarine cables, global backbone
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 मार्च 2025
March 10, 2025

Appreciation for PM Modi’s Efforts in Strengthening Global Ties