युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी आज संपर्क साधून लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
झेलेन्स्की यांचे आभार मानताना पंतप्रधानांनी युक्रेनसह भारताची भागीदारी अधिक बळकट करण्याच्या वचनाचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी निकट सहयोगाची आणि परस्परांना लाभदायक सहकार्याची व्याप्ती दोन्ही देशांतील जनतेच्या फायद्याकरता नवनव्या क्षेत्रांमध्ये वाढवण्याची गरज अधोरेखित केली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात बोलताना पंतप्रधानांनी भारताचा जनकेंद्रित दृष्टीकोन मांडला आणि संघर्ष सोडवून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा युक्रेनच्या सर्व प्रयत्नांना पाठींबा आहे असे सांगितले. संवाद आणि मुत्सदेगिरीच्या माध्यमातून संघर्ष सोडवता येईल या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
संपर्कात राहण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.