प्रिय मित्रहो,
कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल उत्पादनासाठीच्या रशिया –भारत उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो.
रशिया आणि भारत यांच्यात लष्करी आणि तांत्रिक सहकार्य हे पारंपरिक एक प्रमुख विशेष धोरणात्मक भागीदारीचे क्षेत्र राहिले आहे.सात दशकाहून जास्त काळ आम्ही,भारताला विश्वासार्ह आणि उच्च दर्जाची शस्त्रास्त्रे पुरवत आलो आहोत.आमच्या देशाच्या सहकार्याने सुमारे 170 लष्करी आणि औद्योगिक संस्था उभारण्यात आल्या आहेत.
नवा संयुक्त प्रकल्प जग प्रसिध्द नव्या 200 श्रेणीतल्या कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफलची निर्मिती करणार असून अखेरीला हे उत्पादन संपूर्णतः स्थानिक होणार आहे.भारतीय संरक्षण-उद्योग क्षेत्राला, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या, लहान शस्त्रे क्षेत्रातल्या गरजा ,रशियाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्ण करता येणार आहेत.
गेल्या ऑक्टोबरमधल्या माझ्या भारत भेटीदरम्यान माझे समपदस्थ आणि मित्र श्री मोदी आणि मी, या देशात कलाश्निकोव्ह उत्पादनासाठीच्या उभारणीकरिता करार केला होता. आंतर सरकारी करार शक्य त्या कमी वेळात तयार करण्यात येऊन त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. हा करार त्वरेने व्हावा यासाठी,कार्य करणाऱ्या,रशियन आणि भारतीय तज्ञांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.
हा नवा उपक्रम,भारताची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी,राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा वैज्ञानिक आणि औद्योगिक पाया विस्तारण्यासाठी,पात्र मनुष्यबळासाठी,रोजगार निर्मितीसाठी आणि व्यावसायिक शिक्षण आणि कार्मिक प्रशिक्षणासाठी गती देईल असा मला विश्वास आहे.आपल्या दोनही देशातली मैत्री आणि रचनात्मक सहकार्य यांचे प्रतिक म्हणजे हा कारखाना ठरेल.
आपल्या सफलतेची मी कामना करतो, माझ्या शुभेच्छा.