रशियन महासंघाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला.
भारतात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या यशाबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या या तिसऱ्या ऐतिहासिक कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये असलेली विशेष आणि विशेषाधिकारयुक्त व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी यापुढेही कार्य करत राहण्यासंदर्भात सहमती व्यक्त केली.
वर्ष 2024 मध्ये रशियाच्या अध्यक्षतेत सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती दिली.
Thank President Putin for his call to convey his warm wishes and felicitations to the people of India for record participation in general elections and the NDA’s success. We underlined our shared commitment to further strengthen India-Russia Special & Privileged Strategic…
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2024