H.E. Mrs Nguyen Thị Kim Ngan, President of the National Assembly of Vietnam meets PM
India & Vietnam sign bilateral Agreement on Cooperation in Peaceful Uses of Atomic Energy

व्हिएतनाम राष्ट्रीय असेब्लीच्या अध्यक्ष नागयुन थी किम नगान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सप्टेंबर 2016 मध्ये व्हिएतनाममध्ये हनोई येथे उभय नेत्यांच्या झालेल्या भेटीचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले. व्हिएतनामच्या राष्ट्रीय असेब्लींचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्‍या महिला ठरलेल्या नगान या, जगभरातल्या महिलांसाठी स्फूर्तीदायी ठरल्या आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये संसदीय आदान-प्रदान वाढल्याचे स्वागत करतानांच दोन्ही देशातल्या युवा संसदपटूंसाठीही आदान-प्रदानविषयक कार्यक्रम आखण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

नागरी अणू ऊर्जेसंदर्भातल्या सहकार्याविषयी आज स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या द्विपक्षीय करारामुळे, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातली सर्वंकष धोरणात्मक भागिदारी अधिक मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.  

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'

Media Coverage

'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 फेब्रुवारी 2025
February 16, 2025

Appreciation for PM Modi’s Steps for Transformative Governance and Administrative Simplification