व्हिएतनाम राष्ट्रीय असेब्लीच्या अध्यक्ष नागयुन थी किम नगान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सप्टेंबर 2016 मध्ये व्हिएतनाममध्ये हनोई येथे उभय नेत्यांच्या झालेल्या भेटीचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले. व्हिएतनामच्या राष्ट्रीय असेब्लींचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या नगान या, जगभरातल्या महिलांसाठी स्फूर्तीदायी ठरल्या आहेत असे पंतप्रधान म्हणाले.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये संसदीय आदान-प्रदान वाढल्याचे स्वागत करतानांच दोन्ही देशातल्या युवा संसदपटूंसाठीही आदान-प्रदानविषयक कार्यक्रम आखण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
नागरी अणू ऊर्जेसंदर्भातल्या सहकार्याविषयी आज स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या द्विपक्षीय करारामुळे, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातली सर्वंकष धोरणात्मक भागिदारी अधिक मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
Mrs. Nguyen Thi Kim Ngan, President of the National Assembly of Vietnam met PM @narendramodi. pic.twitter.com/fduG5AuMsR
— PMO India (@PMOIndia) December 9, 2016