फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज दूरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांचे निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आणि सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार व्यक्त केले आणि भारत आणि फ्रान्समधील मजबूत आणि विश्वासार्ह धोरणात्मक भागीदारी आगामी काळात नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज असल्याचे अधोरेखित केले.
'होरायझन 2047' कृती आराखड्यातील बांधिलकीच्या पूर्ततेसाठी एकत्र काम करत राहण्यास उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.
डी-डेच्या ऐतिहासिक 80 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना शुभेच्छा दिल्या.
आगामी पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली.
Delighted to receive a phone call from my dear friend, @EmmanuelMacron. Conveyed my commitment to work together to accomplish the ambitious 'Horizon 2047' roadmap. The strong and trusted Strategic Partnership between India & France is slated to scale newer heights in the times to…
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2024