संयुक्त राष्ट्र आमसभेच्या निर्वाचित अध्यक्ष मारिया फर्नांडा एस्पिनोसा गार्सेस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी 73 व्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल एस्पिनोसा यांचे अभिनंदन केले. एस्पिनोसा यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेच्या आगामी अधिवेशनासाठी आपला प्राधान्यक्रम सांगितला. नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भारताकडून पूर्ण आणि रचनात्मक सहकार्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी त्यांना दिले.
दहशतवाद, संयुक्त राष्ट्र सुधारणा आणि हवामान बदल यासारख्या प्रमुख जागतिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्राकडून ठोस कारवाईच्या गरजेबाबत त्यांनी चर्चा केली.