पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने नैसर्गिक वायू क्षेत्रातील बहुप्रतिक्षित सुधारणा असलेल्या
युनिफाइड टॅरिफची अंमलबजावणी सुरू केली आहे.
ऊर्जा आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील ही एक उल्लेखनीय सुधारणा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले आहे.
देशातील सर्व क्षेत्रांच्या आर्थिक विकासाच्या उद्देशाने, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ नैसर्गिक वायू क्षेत्रातील एक बहुप्रतीक्षित सुधारणा असलेल्या युनिफाइड टॅरिफची अंमलबजावणी सुरू करत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एका ट्विट थ्रेडद्वारे दिली आहे.
ही टॅरिफ यंत्रणा भारताला ‘वन नेशन वन ग्रिड वन टॅरिफ’ मॉडेल साध्य करण्यास मदत करेल आणि दूर्गम भागात गॅस बाजाराला चालना देईल, असेही पुरी यांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटच्या थ्रेडला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"ऊर्जा आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील लक्षणीय सुधारणा."
Noteworthy reform in the energy and natural gas sector. https://t.co/PqFwNg5tdX
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2023