पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय प्रशासकीय सेवेतील 170 हून अधिक तरुण अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या सर्वांची अलिकडेच सरकारने सहायक सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.19069400_1530712794_ias1.jpg)
पंतप्रधानांनी त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कालावधीतला अनुभव सांगण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी त्यांच्याबरोबर लोक सहभाग, माहितीचा ओघ, संसाधनांचा योग्य वापर आणि प्रशासनातील लोकांचा विश्वास यासह सुशासनाच्या काही घटकांबाबत चर्चा केली.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.34830500_1530712809_ias2.jpg)
ग्राम स्वराज अभियान, आयुष्मान भारत यांसारख्या अलिकडच्या प्रशासकीय उपक्रमांबाबतही चर्चा झाली.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.22269400_1530712826_ias3.jpg)
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.01452400_1530712864_ias4.jpg)
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.