जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा लोकांनी घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
“पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा आज जलदिनानिमित्त आपण घेऊ या. पाणी वाचवण्याचा निर्णय एकदा का “जनशक्तीने” मनापासून घेतला, तर आपण “जलशक्ती” यशस्वीपणे वाचवू शकणार आहोत.
संयुक्त राष्ट्राने यावर्षी सांडपाणी विषय निवडला आहे. त्यामुळे पाण्याच्या पुनर्वापराविषयी जागृती निर्माण होईल तसेच पाण्याचे आपल्याला असलेले महत्व अधोरेखित करेल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
On #WorldWaterDay lets pledge to save every drop of water. When Jan Shakti has made up their mind, we can successfully preserve Jal Shakti.
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2017