25 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे भेट देणार आहेत.
शांती निकेतन येथे भारत आणि बांगलादेश यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक म्हणून ते बांग्लादेश भवनाचे उद्घाटन करतील. बांगलादेशाच्या पंतप्रधान, शेख हसीना, या दोन्ही कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतील.
झारखंड मध्ये पंतप्रधान, भारत सरकारच्या आणि झारखंड सरकारच्या विविध प्रकल्पांचे सिंद्री येथे पायाभरणी करतील यामध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे.
· हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन मर्यादितचा सिंद्री खते प्रकल्प
· ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), देवघर
. देवघर विमानतळाचा विकास
. पत्रातू सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट (3×800 मेगावॅट)
. ते जन औषधी केंद्राच्या सामंजस्य कराराच्या देवाणघेवाण संदर्भात कार्यक्रमात साक्षीदार म्हणून उपस्थित राहतील.
पंतप्रधान यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील.नंतर, रांची येथे झारखंड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिका-यांशी संवाद साधणार आहेत.