पंतप्रधान, दिनांक २२ सप्टेंबर ला ओडिशा आणि छत्तीसगढ या राज्यांना भेट देणार आहेत.
ओडिशा येथील तालचेर येथे, तालचेर फर्टिलायझर प्लान्टच्या पुनरुत्थानासाठी ठेवलेल्या कोनशिलेचे ते अनावरण
करतील. हा भारतातला पहिला खत प्रकल्प राहील, जिथे कोळशाचे वायूमध्ये रूपांतरण केले जाईल. या व्यतिरिक्त, या प्रकल्पाद्वारे, अशा नैसर्गिक गॅसची निर्मिती केली जाईल ,जी देशाच्या ऊर्जा गरजांची पूर्ती करेल.
त्यानंतर पंतप्रधान झारसुगुडा येथे जातील, जिथे ते झारसुगुडा विमानतळाचे उद्घाटन करतील.
या विमानतळाद्वारे पश्चिम ओडिशाला भारताच्या विमानतळ नकाशावर आणेल जाईल, आणि उडानच्या माध्यमातून क्षेत्रीय विमानतळ संलग्नीकरणाची सेवा देण्यात येतील.
पंतप्रधान गार्जनबहाल कोळसा खाणी, आणि झारसुगुडा – बारापल्ली- सारडेगा रेल्वे जोडणी राष्ट्राला समर्पित करतील. ते डुलांगा कोळसा खाणीतून कोळसा निर्मिती आणि दळणवळणाच्या कामासाठी ठेवण्यात येणाऱ्या कोनशिलेचे अनावरण करतील.
त्यानंतर पंतप्रधान छत्तीसगढमधील जंजगीरं – चंपा येथे पोहोचतील. पारंपारिक हातमाग आणि शेतीवरील प्रदर्शनास ते भेट देतील. ते राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि पेन्द्र- अनुप्पूर तिसऱ्या रेल्वे मार्गाची कोनशिला ठेवतील. त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करतील.