पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या प्रयागराज येथे कुंभमेळ्याला भेट देतील. कुंभमध्ये पंतप्रधान स्वच्छ कुंभ स्वच्छ आभार या कार्यक्रमात सहभागी होतील, हा कार्यक्रम पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या द्वारे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी पंतप्रधान स्वच्छ कुंभ स्वच्छ आभार पुरस्कार सफाई कर्मचारी, स्वच्छाग्रही, पोलीस कर्मचारी तसेच नाविक यांना प्रदान करतील. यावेळी स्वच्छ सेवा सन्मान बेनिफिट पॅकेजचे डिजिटल अनावरण करण्यात येईल.
यानंतर पंतप्रधान उपस्थित समुदायाला संबोधित करतील.
तसेच यावेळी पंतप्रधान त्रिवेणीसंगमावर स्नान करतील तसेच प्रयागराज मध्ये सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील.
या वर्षीच्या प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळ्यामध्ये स्वच्छ भारत उपक्रम तसेच स्वच्छतेवर अभूतपूर्व लक्ष देण्यात आले होते. स्वच्छ कुंभ स्वच्छ आभार पुरस्कार देऊन पंतप्रधान स्वच्छ कुंभ आयोजित करण्यासाठी झटत असलेल्या लोकांचा सत्कार करतील.