पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी हिमाचल प्रदेशमधील बिलासपूरला भेट देणार आहेत.
पंतप्रधान बिलासपूर येथे अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) भूमिपूजन करतील. अंदाजे 1350 कोटी रुपये खर्चून हे 750 खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. आरोग्यसेवेव्यतिरिक्त या संस्थेत सुश्रूषासह पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील वैद्यकीय शिक्षण देखील देण्यात येणार आहे.
पंतप्रधान उना येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयआयटी) भूमिपूजन करणार आहेत
कांग्रा येथील कान्द्रोरी येथे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्टील प्रोसेसिंग युनिटचे उदघाटनही नरेंद्र मोदी करणार आहेत.
त्यांनतर ते जनसभेला संबोधित करतील.