पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर 2018 रोजी हरियाणातील रोहतकमधल्या संपलाचा दौरा करणार आहेत.
ते दीनबंधू सर छोटूराम यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. सर छोटूराम यांनी शेतकऱ्यांचे कल्याण तसेच मागास आणि वंचितांच्या उद्धारासाठी अविरत काम केले आहे. शिक्षण क्षेत्र आणि अन्य सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या कार्याचे पंतप्रधानांनी स्मरण केले.
सोनपत येथील रेल्वे बोगी कारखान्याच्या पायाभरणी निमित्त एका कोनशिलेचे ते अनावरण करतील. उत्तर भारतातील रेल्वे बोगींसाठी दुरुस्ती आणि देखभालीची प्रमुख सुविधा बनेल. मॉड्यूलर आणि प्री फॅब्रिकेटेड बांधकाम तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रे आणि पर्यावरणाला अनुकूल वैशिष्ट्यांचा वापर करून याची निर्मिती केली जाणार आहे.