पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणंद इथे अन्नप्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यात अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेटनिर्मिती प्रकल्पाचेही उद्घाटन होणार आहे. आंदण कृषी विद्यापीठाच्या इंक्युबेशन केंद्र आणि अन्नप्रकीया केंद्रातील उत्कृष्टता केंद्राचे तसेच मुझकुवा गावातील सौर सहकार्य सोसायटीचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. त्यानंतर आणंद आणि खात्रज इथल्या अमूल उत्पादन केंद्राच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान जाहीर सभेत भाषण देतील.
या कार्यक्रमानंतर अंजार येथे जाणार आहेत. तिथे त्यांच्या हस्ते मुंद्रा एलएनजी टर्मिनल, अंजार-मुंद्रा पाईपलाईन प्रकल्प आणि पालनपूर-पाली-बाडमेर पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन होईल. तिथेही पंतप्रधानांची सभा होणार आहे.
त्यानंतर पंतप्रधान राजकोटला जाणार आहेत. तिथे ते महात्मा गांधी संग्रहालयाचे उद्घाटन करतील. राजकोटच्या आल्फ्रेड उच्च माध्यमिक शाळेत हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या शालेय जीवनातील जडणघडणीत या शाळेचे महत्वाचे योगदान होते. या संग्रहालयामुळे गांधी विचार आणि संस्कृती, मूल्ये आणि तत्त्वज्ञान यांच्याविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होईल. त्यानंतर तेथील 624 घरांच्या गृहनिर्माण प्रकल्पाची कोनशिला पंतप्रधानाच्या हस्ते ठेवली जाईल. तसेच त्यांच्या उपस्थितीत 240 लाभार्थी कुटुंबांचा ई-गृहप्रवेश होईल.
नवी दिल्लीला परत जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी वस्तू संग्रहालयाला भेट देतील .