पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 7 आणि 8 ऑक्टोबर 2017 असे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पंतप्रधान द्वारकाधीश मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर द्वारका येथे ओखा ते बेट द्वारका या दरम्यान बांधण्यात येणाऱ्या सेतुचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ते सार्वजनिक सभेला मार्गदर्शनही करणार आहेत.
द्वारकेचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधानांचे सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या छोटीला येथे आगमन होणार असून येथे राजकोट विमानतळ, अहमदाबाद-राजकोट या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शिलान्यास करणार आहेत. तसेच राजकोट-मोरबी या राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शिलान्यास करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान संपूर्ण स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत.
गांधीनगर इथल्या आयआयटीच्या नूतन वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाचा प्रारंभही करणार आहेत.
8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे वडनगरला आगमन होणार आहे. पंतप्रधान झाल्यापासून त्यांची वडनगरला ही पहिलीच भेट आहे. यावेळी ते हटकेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. तसेच एका सार्वजनिक सभेला मार्गदर्शन करतील. पंतप्रधानांच्या हस्ते लसीकरणाच्या इंद्रधनुष्य मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.
पंतप्रधान आरोग्य सेविकांना ई-टॅबलेटस् वितरीत करून आयएम रेको योजना चालू करतील. आयएम रेको हे एक नवीन मोबाईल ॲपअसून एएसएचए सेविंकांच्या कामाचे निरीक्षण, पाठिंबा आणि त्यांना अभिप्रेरित करण्यासाठी याचा उपयोग होतो याद्वारे नवीन जन्मदर, शिशू आरोग्य या संबंधितांचा समुदाय आरोग्य कृतीसाठी इनोव्हेटीव मोबाईल फोन तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येणार आहे. पंतप्रधान सार्वजनिक सभेला संबोधित करतील.
यानंतर दुपारी पंतप्रधानांचे भडोचला आगमन होणार आहे. नर्मदा नदीवर पुलाचा शिलान्यास त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उधना (सुरत-गुजरात) ते जयनगर (बिहार) यांच्या दरम्यान नव्याने सुरू केलेल्या अंत्योदय एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गुजरात नर्मदा खत महामंडळाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि सार्वजनिकसभेचंही आयोजन येथे केले आहे.
दि. 8 ऑक्टोबरला संध्याकाळी पंतप्रधान राजधानी दिल्लीत परततील.