घोघा येथे एका सभेत पंतप्रधान घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. या फेरी सेवेमुळे सौराष्ट्रमधील घोघा आणि दक्षिण गुजरातमधील दहेज दरम्यान प्रवासाचा वेळ सात ते आठ तासांवरून केवळ एका तासापर्यंत इतका कमी होणार आहे. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर यातून वाहनांचीही वाहतूक करता येईल. रविवारी पंतप्रधान पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील जो प्रवासी वाहतुकीसाठी आहे. पंतप्रधान घोघा ते दहेज दरम्यान पहिल्या फेरीसेवेतून प्रवास करतील. त्यांनतर दहेज येथे एका जनसभेला संबोधित करतील.
तसेच घोघा येथे एका जनसभेत पंतप्रधान श्री भावनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सर्वोत्तम पशु आहार संयंत्रचा शुभारंभ करतील.
दहेज इथून पंतप्रधान वडोदऱ्याला जातील. तिथे एका जनसभेत ते वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित करतील.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी आणि ग्रामीण) लाभार्थ्यांना पंतप्रधान घरांच्या चाव्या सुपूर्द करतील. एकात्मिक वाहतूक केंद्र, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, गृहनिर्माण प्रकल्प आणि उड्डाणपुलासह अनेक पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे भूमिपूजन ते करतील. तसेच वडोदरा येथे मुंद्रा-दिल्ली पेट्रोलियम उत्पादन पाईपलाइनच्या क्षमता विस्ताराचे आणि एचपीसीएलच्या ग्रीनफिल्ड मार्केटिंग टर्मिनल प्रकल्पाचे भूमिपूजनही ते करतील.