पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 फेब्रुवारी 2019 रोजी पश्चिम बंगालच्या दुर्गापूरला भेट देणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान अंदाल-संथिया-पकूर-माल्दा आणि खाना-संथिया या 294 किलोमीटर लांबीच्या रेल्वे विद्युतीकरण क्षेत्राला भेट देतील. या विद्युतीकरणामुळे कोळसा, खडी आणि दगडांच्या चिपा यांची वाहतूक उत्तर आणि ईशान्य भारतात करणे सहज शक्य होणार आहे.
ते 20 किलोमीटर लांबीचा हिजली-नारायणगड रस्ता राष्ट्राला अर्पण करतील.