पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभात ते विद्यार्थ्यांना संबोधित करतील. त्यानंतर मोकामा येथे पंतप्रधान नमामी गंगे प्रकल्पाच्या चार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे भूमीपूजन करतील. तसेच चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. या सर्व प्रकल्पांसाठी 3,700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इथेही पंतप्रधान एका सभेत भाषण करतील.
या सांडपाणी प्रकल्पांमध्ये बेऊर, कर्मालीचाक आणि सईदपूर इथल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे सांडपाणी प्रक्रिया क्षमता 120 एमएलडी पर्यंत वाढेल. सध्या बेऊर येथे ही क्षमता 20 एमएलडी इतकी आहे.
चार महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजनही यावेळी होईल. यात औंता-सीमारीया, बख्तीयारपूर- मोकामा, महेशखुंट-सहरसा-पुर्णिया, बिहारशरीफ-बारबिघा-मोकामा अशा महामार्गांचा समावेश आहे.