पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 3 मार्च, 2019 रोजी उत्तर प्रदेशातील अमेठीला भेट देणार आहेत.
पंतप्रधान अमेठीमधील कौहर येथे इंडो-रशिया रायफल प्रायव्हेट लिमिटेड राष्ट्राला सर्पित करणार आहेत.
इंडो-रशिया रायफल प्रायव्हेट लिमिटेड हा भारताच्या आयुध कारखाना आणि रशियन कंपनीचा संयुक्त उपक्रम असून भारत- रशिया सहकार्यातील मैलाचा दगड आहे.
कोरवा आयुध कारखान्यात प्रसिद्ध कलशनिकोव्ह रायफल्सच्या अत्याधुनिक श्रेणीतील रायफल्सची निर्मिती केली जाणार आहे.
हा संयुक्त उपक्रम मेक इन इंडियाचे झगमगते उदाहरण आहे , जो देशातील सशस्त्र दलाची मदत करेल आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करेल. या कारखान्यामुळे अमेठी
आणि आसपासच्या परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा संयुक्त उपक्रम उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर प्रकल्पाला मोठी चालना देईल.
पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांचे देखील उदघाटन करणार आहेत. हे प्रकल्प वीज निर्मिती , आरोग्य आणि उत्पादन क्षेत्राशी निगडित आहेत. अमेठी आणि उत्तर प्रदेशला या प्रकल्पांचा थेट लाभ मिळेल.
पंतप्रधान कौहर येथे एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.