पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत 7 लोक कल्याण मार्ग येथे गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त एक नाणे प्रकाशित केले. यावेळी उपस्थित समुदायाला पंतप्रधान संबोधित करणार आहेत.
शिखांचे दहावे गुरु ‘गुरु गोविंद सिंग’ हे त्यांची शिकवण आणि मूल्यांच्या माध्यमांतून अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत राहिले आहेत. पाटणा येथे 5 जानेवारी 2017 रोजी श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या 350 व्या जयंती समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यानिमित्त त्यांनी एका स्मृती टपाल तिकीटाचे प्रकाशन केले होते. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी गुरु गोविंद सिंग यांनी कशाप्रकारे खालसा पंथ आणि भारताच्या विविध भागातील ‘पंज प्यारे’च्या माध्यमातून देशाला एकत्र आणण्याचा विशेष प्रयत्न केल्याचे अधोरेखित केले.गुरु गोविंद सिंगजी यांनी ज्ञानाला त्यांच्या शिकवणीच्या केंद्र स्थानी ठेवले, असे ते म्हणाले.
दुर्बल घटकांसाठी गुरु गोविंद सिंग यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण करत पंतप्रधानांनी 30 डिसेंबर 2018 रोजी आकाशवाणीवरुन प्रसारीत झालेल्या त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात मानवी वेदनांचे निर्मृलन ही सर्वात मोठी सेवा असल्याचा गुरु गोविंद सिंग यांचा विश्वास होता, असे सांगितले. गुरु गोविंद सिंगजी यांच्या कर्तृत्व, त्याग आणि समर्पित वृत्तीची त्यांनी प्रशंसा केली.
18 ऑक्टोबर 2016 रोजी लुढीयाना येथे राष्ट्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पुरस्कार सोहळ्यात गुरु गोविंद सिंग यांच्या संदेशाची आठवण करुन दिली होती. लोकांनी संपूर्ण मानव जाती एक मानावी, ‘कोणीही श्रेष्ठ नाही किंवा कोणीही दुय्यम नाही, कोणीही अस्पृश्य नाही किंवा स्पृश्य नाही’ हा त्यांचा संदेश आजच्या काळालाही लागू आहे. 15 ऑगस्ट 2016 रोजी स्वातंत्र्य दिनी केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधानांनी पुन्हा एकदा शिख गुरुंनी देशासाठी केलेल्या त्यागाची आठवण करुन दिली होती.