पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांचं उद्या सकाळी वाराणसीत स्वागत करणार आहेत.
त्यानंतर दोन्ही नेते मिर्झापूरला रवाना होतील, जिथे ते एका सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करून परत वाराणसीत येतील.
वाराणसीमध्ये मोदी आणि मॅक्राँ दिनदयाळ हस्तकला संकुलाला भेट देतील आणि तिथल्या कारागिरांशी संवाद साधून त्यांच्या हस्तकलांचे प्रात्यक्षिकही पाहतील.
त्यानंतर दोन्ही नेते प्रसिद्ध अस्सी घाट येथे जातील. गंगेच्या घाटांची बोटीतून सफर केल्यानंतर मोदी आणि मॅक्राँ ऐतिहासिक दशमेश्वमेध घाटाला भेट देतील.
पंतप्रधान मोदी वाराणसीतल्या मधुवार्दाह रेल्वे स्थानक ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करतील तसेच डीएलडब्ल्यू मैदानावर जनसभेला संबोधित करतील.