भारतीय राज्यघटनेच्या स्वीकाराला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, या महत्त्वपूर्ण प्रसंगानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय संकुलातील सभागृहात संध्याकाळी 5 वाजता संविधान दिनाचा सोहळा होणार आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल (2023-24) जारी करणार असून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
हा कार्यक्रम भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केला आहे. भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशही यावेळी उपस्थित राहणार आहेत.