देशभरात जलद गतीने कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित
मेरठ ते प्रयागराज दरम्यानचा हा द्रुतगती महामार्ग उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांमधून जाणार असून राज्याच्या पश्चिम आणि पूर्वेला जोडणार आहे
यासाठी 36,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असून उत्तर प्रदेशचा सर्वात लांब एक्सप्रेस वे बनेल
शाहजहानपूरमधील द्रुतगती महामार्गावर हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन टेक ऑफ आणि लँडिंगला मदत करण्यासाठी 3.5 किमी लांबीची हवाई पट्टिका बांधण्यात येणार आहे
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे गंगा एक्सप्रेस वेची पायाभरणी करणार आहेत.

हा द्रुतगती महामार्ग देशभरात जलद गतीने कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित आहे.  594 किमी लांबीचा हा सहा पदरी एक्सप्रेसवे 36,200 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. मेरठमधील बिजौली गावाजवळून सुरू होणारा हा एक्सप्रेसवे प्रयागराजमधील जुडापूर दांडू गावापर्यंत जाणार आहे. हा महामार्ग  मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बुदौन, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराजमधून जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर, हा उत्तर प्रदेशचा सर्वात लांब द्रुतगती महामार्ग बनेल आणि  राज्याच्या पश्चिम आणि पूर्व भागांना जोडेल. हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन टेक ऑफ आणि लँडिंगसाठी 3.5 किमी लांबीची हवाई पट्टीका (एअर स्ट्रीप) देखील शाहजहानपूरमधील एक्सप्रेस वेवर बांधण्यात येणार आहे.  द्रुतगती मार्गाजवळ एक औद्योगिक कॉरिडॉर देखील बांधण्याचा प्रस्ताव आहे.

द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक विकास, व्यापार, कृषी, पर्यटन इत्यादींसह अनेक क्षेत्रांना चालना मिळेल. यामुळे या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
MSME exports touch Rs 9.52 lakh crore in April–September FY26: Govt tells Parliament

Media Coverage

MSME exports touch Rs 9.52 lakh crore in April–September FY26: Govt tells Parliament
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2025
December 21, 2025

Assam Rising, Bharat Shining: PM Modi’s Vision Unlocks North East’s Golden Era