हा द्रुतगती महामार्ग देशभरात जलद गतीने कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित आहे. 594 किमी लांबीचा हा सहा पदरी एक्सप्रेसवे 36,200 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. मेरठमधील बिजौली गावाजवळून सुरू होणारा हा एक्सप्रेसवे प्रयागराजमधील जुडापूर दांडू गावापर्यंत जाणार आहे. हा महामार्ग मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बुदौन, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराजमधून जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर, हा उत्तर प्रदेशचा सर्वात लांब द्रुतगती महामार्ग बनेल आणि राज्याच्या पश्चिम आणि पूर्व भागांना जोडेल. हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन टेक ऑफ आणि लँडिंगसाठी 3.5 किमी लांबीची हवाई पट्टीका (एअर स्ट्रीप) देखील शाहजहानपूरमधील एक्सप्रेस वेवर बांधण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गाजवळ एक औद्योगिक कॉरिडॉर देखील बांधण्याचा प्रस्ताव आहे.
द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक विकास, व्यापार, कृषी, पर्यटन इत्यादींसह अनेक क्षेत्रांना चालना मिळेल. यामुळे या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.