पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2018 रोजी झारखंडमधील रांची येथे प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेई) सुरू करणार आहेत. या योजनेअंतर्गत, 10 कोटी कुटुंबांना प्रत्येक वर्षी रुपये पाच लाख रुपयांच्या आरोग्य विम्याची तरतूद करण्यात येणार आहे.पंतप्रधान, रांची येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करणार ; सिक्किम येथील पकयाँग विमान तळाचे हिउदघाटन करणार आहेत.
पंतप्रधान पीएमजेएवाय वर आधारित प्रदर्शनास भेट देतील. ते लाभार्थी ओळख पत्र आणि ई-कार्ड निर्मिती संदर्भातील प्रात्यक्षिकांना उपस्थित राहतील.
त्याच वेळी पंतप्रधान चियाबासा आणि कोडरमा येथे वैद्यकीय महाविद्यालयां ची कोनशिला ठेवतील ते १० आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्घाटन करतील. गंगटोक, सिक्किमला जाण्याआधि ते उपस्थित जनतेला संबोधित करतील .