युवा संशोधक आणि स्टार्ट-अप उद्योजकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संवाद साधणार आहेत.
‘उद्या सकाळी 9.30 वाजता स्टार्ट-अप आणि नाविन्यता क्षेत्रातील युवांशी मी संवाद साधणार आहे. या संवादाच्या माध्यमातून स्टार्ट-अप उद्योजक म्हणून नावारुपाला आलेल्या युवा वर्गाशी थेट संभाषणाची संधी मिळणार आहे.
स्टार्ट अप आणि नाविन्यतेचे केंद्र म्हणून भारत उदयाला येत आहे. भविष्याचा वेध घेत आणि चाकोरी बाहेरील कल्पना विचारात घेत भारतीय युवांनी या क्षेत्रात स्वत:ला प्रस्थापित केले आहे. उद्याच्या संवादामध्ये आघाडीच्या इनक्युबेशन सेंटर आणि टिंकरिंग लॅब मधील युवांचा समावेश असेल.
युवा वर्गाने या उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन मी करतो. शिकण्याची, विकासाची आणि प्रेरणा प्राप्त करण्याची ही एक अनोखी संधी आहे. नरेंद्र मोदी मोबाईल ॲप किंवा @DDNewsLive च्या माध्यमातून आपण या संवादात सहभागी होऊ शकता. आपण आपल्या कल्पना किंवा सूचना, सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहचवू शकता.’