पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडे नऊ वाजता व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे म्हणणे थेट ऐकण्याची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याशी संबंधित विविध उपक्रमांबाबत चर्चा करणार आहेत. कृषी विज्ञान केंद्राची सामान्य सेवा केंद्रे, दूरदर्शन, डीडी किसान आणि आकाशवाणीवरुन हा कार्यक्रम थेट प्रसारीत केला जाईल. सुमारे 2 लाख सामान्य सेवा केंद्रे आणि 600 कृषी विज्ञान केंद्रे व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून जोडली जातील. नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून जनतेला पंतप्रधानांशी संवाद साधता येईल.