पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 11 फेब्रुवारी 2019 ला भारतीय एक्सपो सेंटर ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे पेट्रो टेक 2019 चे उद्घाटन करतील तसेच ते उद्घाटन समारंभाला संबोधित करतील.
पेट्रो टेक 2019 ही भारताची फ्लॅग शीप हायड्रोकार्बन परिषद आहे.
भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत 13 व्या आंतरराष्ट्रीय तेल आणि गॅस परिषद तसेच प्रदर्शनी, ‘पेट्रो 2019’ चे आयोजन करण्यात आले आहे. भागीदार देशांचे 95 उर्जा मंत्री आणि आणि जवळपास सत्तर देशांचे प्रतिनिधी या पेट्रो टेक 2019 परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
ग्रेटर नोएडा च्या वीस हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रात ही प्रदर्शनी दूरवर पसरली असून परिषदेसह विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत. पेट्रो टेक 2019 प्रदर्शनीमध्ये मेक इन इंडिया आणि पुनर्नवीकरण ऊर्जा संकल्पनांवर आधारित तेरा देशांचे विविध दालने आणि जवळपास 40 देशांमधील 750 प्रदर्शनी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
या आधी पंतप्रधानांनी 5 डिसेंबर 2016 रोजी बाराव्या पेट्रो टेक 2016 चे उद्घाटन केले होते.
ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा शाश्वतता ,ऊर्जा क्षमता आणि ऊर्जा उपलब्धता हे चार स्तंभ पंतप्रधानांनी भविष्याचा दृष्टीकोनातून भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी जागतिक हायड्रोकार्बन संस्थांना भारताच्या मेक इन इंडिया मध्ये गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आणि त्यांनी आश्वासन दिले की, भारत रेड कार्पेटपासून ते रेड कार्पेटपर्यंत बदल घडवून आणेल.