राजधानी नवी दिल्लीत मुनिर्का येथे उभारण्यात आलेल्या केंद्रीय माहिती आयोगाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या इमारतीमध्ये आयोगाला एकाच ठिकाणाहून काम करणे शक्य होईल, यापूर्वी भाडे तत्वावरील दोन इमारतींमधून आयोगाचे कामकाज सुरु होते. आयोगाची नवी इमारत नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनने मुदतीपूर्व बांधून पूर्ण केली आहे. अत्याधुनिक सुविधांयुक्त अशा या पाच मजली इमारतीमध्ये माहिती तंत्रज्ञान तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधाही उपलब्ध आहेत. माहितीचा अधिकार 2005 अधिनियमान्वये केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली होती.