पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आसामला भेट देणार आहेत. तिनसुखिया जिल्ह्यातल्या ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या धौला-सदिया पुलाचं पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. गुवाहाटी एम्स, आयएआरआय गोगामुख या दोन महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान संध्याकाळी खानपारा येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधानांनी आसाम भेटीचा तपशील ट्विटरद्वारे जाहीर केला असून आसाममधल्या जनतेशी संवाद साधण्यासाठी आपण उत्सूक असल्याचे म्हटले आहे.
विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी उद्या आसामला भेट देणार आहे. आसाममधल्या जतनेशी संवाद साधण्याची मी वाट पहात आहे.
एम्स आणि आयएआरआय या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची कोनशिला आपण बसवणार असून या दोन्ही प्रकल्पांमुळे आसामसह ईशान्य भागाचा विकास झपाट्यानं होणार आहे. धोला-सदिया पुलाचं उद्या उद्घाटन होणार आहे. आपल्या देशातल्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. संध्याकाळी खानपारा येथे जनसभेला आपण संबोधित करणार असून https://nm4.in/dnldapp द्वारे मोबाईलवर हे भाषण पाहू शकता असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.