पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी बंगळुरु इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठात 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन करतील. यावेळी ते उद्घाटनपर भाषण देतील, तसेच I-STEM पोर्टलचे उद्घाटन करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या भारतीय विज्ञान काँग्रेसची संकल्पना आहे, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान: ग्रामीण विकास’. नोबेल पारितोषिक विजेते, विविध संस्थांमधील वैज्ञानिक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, विद्यार्थी आणि प्रतिनिधी यांच्यासह 15 हजारहून अधिक लोकांचा सहभाग या कार्यक्रमात अपेक्षित आहे. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती “ISC 2020 UASB” या मोबाईल ॲपवर मिळू शकेल. हे ॲप गुगल प्ले-स्टोरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.indiansciencecongress&hl=en_IN उपलब्ध आहे.