पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 2 जानेवारी 2020 रोजी कर्नाटकातल्या तुमकुर येथे एका सार्वजनिक सभेत कृषी कर्मण पुरस्कार आणि प्रशंसा पुरस्कार राज्यांना प्रदान करतील. तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांचे कृषी कर्मण पुरस्कारही वितरित करतील.
या कार्यक्रमात पीएम किसान (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी) चा डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीसाठीचा 2000 रुपयांचा तिसरा हफ्ता जारी करण्यात येईल. यामुळे सुमारे 6 कोटी लाभार्थ्याना फायदा होणार आहे. पीएम किसान अंतर्गत 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान केली जातील.
याच कार्यक्रमात पंतप्रधान तामिळनाडूतल्या निवडक शेतकऱ्यांना खोल समुद्रात मत्स्यनौका आणि फिशिंग व्हेसल ट्रान्स्पाँडर्सच्या चाव्या प्रदान करतील.
कर्नाटकातील निवडक शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड वितरित केली जातील.
पंतप्रधान या ठिकाणी आयोजित प्रदर्शनालाही भेट देतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.