पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2 एप्रिलला भारतातल्या सर्वात लांब म्हणजेच 9 किमीच्या चेनानी-नाशरी या बोगद्याचे राष्ट्रार्पण करणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग 44 वर बांधलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर एकमेकांशी जोडले जाणार आहे. या बोगद्यामुळे दोन शहरांमधील अंतर दोन तासांनी कमी होणार आहे. तर 31 किमी मार्गाचा प्रवास कमी होणार आहे. या बोगद्यामुळे दररोज 27 लाख रुपये किमतीच्या इंधनाची बचत होईल, असा अंदाज आहे.
या रस्त्यावरुन सुरक्षित आणि सर्व ऋतुमध्ये प्रवास करणे शक्य होणार आहे. या बोगद्यात जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली असून त्यातून जम्मू-काश्मिरमधील व्यापाराला आणि पर्यटनाला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या बोगद्याची ठळक वैशिष्टये
एकाच पोकळीत तयार करण्यात आलेला हा द्विमार्गी बोगदा असून त्याची उंची पाच मीटर इतकी आहे.
या बोगद्याच्या दर 300 मीटर अंतरावर बाहेर निघण्यासाठी छोटे समांतर बोगदे बांधण्यात आले आहेत.
या बोगद्याच्या एकात्मिक वाहतूक नियंत्रण व्यवस्था, टेहळणी व्यवस्था, हवा खेळती राहण्यासाठीची सुविधा, अग्निशमन व्यवस्था आणि आपत्तकालीन परिस्थितीमध्ये मदत मिळविण्यासाठीची यंत्रणा दर 150 मीटरवर उभारण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 2500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाला.
PM Modi to dedicate India's longest road tunnel in Jammu and Kashmir
India's longest road tunnel connecting Jammu and Srinagar to reduce travel time by upto two hours