QuotePM to confer Awards for Excellence in Public Administration and address Civil Servants tomorrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 21 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे जिल्हे/अंमलबजावणी संस्था आणि अन्न केंद्रीय आणि राज्य संघटनांना निवडक प्राधान्य कार्यक्रम आणि अभिनव कल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार प्रदान करतील.

जिल्हे आणि केंद्र आणि राज्य सरकारांच्या संघटनांनी नागरिकांच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पंतप्रधान पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले चार प्राधान्य कार्यक्रम : 1) पंतप्रधान पीक विमा योजना 2) डिजिटल भरणा करायला प्रोत्साहन 3) पंतप्रधान आवास योजना-शहरी आणि ग्रामीण आणि 4) दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. याशिवाय जिल्ह्यांसह केंद्रीय, राज्य संघटनांसाठी नवोन्मेष पुरस्कार देखील आहेत. चार प्राधान्य कार्यक्रमांसाठी यंदा 11 पुरस्कार दिले जाणार असून दोन पुरस्कार केंद्र/राज्य सरकारच्या संघटनांना नावीन्यपूर्ण संशोधनासाठी दिले जातील. यापैकी एक पुरस्कार महत्वाकांक्षी जिल्ह्याला दिला जाईल.

यावेळी पंतप्रधान दोन पुरस्कारांचे प्रकाशन करतील. “न्यू पाथवेज” हे पुस्तक निवडक प्राधान्य कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या अंमलबजावणीवरील यशोगाथांचा संग्रह आहे. तर “ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स : अनलॉकिंग पोटेन्शिअल्स” हे महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या परिवर्तनासाठी आखण्यात आलेल्या धोरणांवर आधारित आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

Media Coverage

"This kind of barbarism totally unacceptable": World leaders stand in solidarity with India after heinous Pahalgam Terror Attack
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 एप्रिल 2025
April 25, 2025

Appreciation From Citizens Farms to Factories: India’s Economic Rise Unveiled by PM Modi