नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्या (11 ऑक्टोबर, 2017) नवी दिल्लीत पुसा येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील.
आयएआरआय येथे या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित “तंत्रज्ञान आणि ग्रामीण जीवन” या विषयावरील प्रदर्शनास भेट देणार आहेत. या प्रदर्शनात ग्रामीण जीवनाला सुखकर बनविणारे 100हून अधिक उपकरणे आणि प्रयोग दाखविले जातील.
ग्रामीण क्षेत्रातील संशोधकांशीही ते संवाद साधतील.
नानाजी देशमुख आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना पंतप्रधान पुष्पांजली अर्पण करतील.
नानाजी देशमुख यांच्यावर स्मृतीप्रित्यर्थ पंतप्रधानांच्या हस्ते एक टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर विकास कामांचा समन्वय आणि देखरेख करण्यासाठी एका पोर्टलची सुरुवातही यावेळी करण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विकासाची कामे आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणारा ग्राम संवाद ॲप्लिकेशनचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल. सूचना से सशक्तीकरण – अशा संकल्पनेवर हे ॲप आधारित आहे. यावेळी पंतप्रधान आयरी येथे प्लान्ट पीनोमिक्स सुविधेचे उद्घाटन करतील.
या कार्यक्रमात पंतप्रधान महिला स्वयं बचतगट, पंचायत, जलसंवर्धन क्षेत्रातील संशोधक, आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थीं अशा सुमारे 10,000 लोकांच्या समुदायाला संबोधित करतील.