राजस्थानमधल्या बारमेर जिल्हयामध्ये पाचप्रदा येथे उभारण्यात आलेल्या राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाचा प्रारंभ उद्या दि. 16 जानेवारी 2018 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून ते जनतेला संबोधित करतील.
राजस्थानात तेल आणि वायूचे लक्षणीय साठे आहेत. “राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्प” हा राज्यातला पहिलाच प्रकल्प आहे. या कारखान्यामार्फत 9 एमएमटीपीए तेल शुध्दीकरण पेट्रोकेमिकल्स कॉम्फ्लेक्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या तेलशुध्दीकरण प्रकल्पामध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात येत असून पर्यावरण संरक्षणासाठी “बीएस-व्हीआय.” अंतर्गत उत्सर्जन नियमांचे पालन करण्यात येणार आहे. एचपीसीएल आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी अंदाजे 43 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्प प्रारंभ कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच विविध केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.