पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 नोव्हेंबर रोजी, लखनौ विद्यापीठाच्या शतक महोत्सवी स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडे पाच वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल. 1920 साली या विद्यापीठाची स्थापना झाली होती, आणि यंदा विद्यापीठ आपले शंभरावे वर्ष साजरे करत आहे.
या प्रसंगी, विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त एका विशेष नाण्याचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच भारतीय टपाल कार्यालयाने जारी केलेले विशेष तिकीट आणि आणि लिफाफ्याचेही पंतप्रधान प्रकाशन करतील. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तरप्रदेशचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.