पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ आणि ८ जानेवारीला मध्य प्रदेशातील तेकानपूर येथील बीएसएफ अकादमीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
पोलीस महासंचालक परिषद हा वार्षिक कार्यक्रम आहे, ज्यात देशभरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी २०१४ मध्ये आसाममधील गुवाहाटी येथे, २०१५ मध्ये गुजरातमधील रण ऑफ कच्छ येथील धोरडो येथे आणि २०१६ मध्ये हैदराबादमधील राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे झालेल्या परिषदांना संबोधित केले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत सीमेपलीकडील दहशतवाद आणि कट्टरतावाद यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली होती. पंतप्रधानांनी नेतृत्व, प्रभावी संवाद आणि सामूहिक प्रशिक्षणाच्या महत्वावर भर दिला होता. त्यांनी पोलीस दलासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवादाचे महत्व याचा विशेष उल्लेख केला होता.
राष्ट्रीय राजधानीबाहेर पोलीस महासंचालकांची वार्षिक परिषदेचे आयोजन हे अशा प्रकारच्या परिषदा देशभरात आयोजित व्हाव्यात, केवळ दिल्लीपुरत्या सीमित राहू नयेत या पंतप्रधानांच्या स्वप्नाला अनुसरून आहे.