लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीच्या 96 व्या फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभात उद्या 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील.  पंतप्रधान नव्या स्पर्धासंकुलाचे उद्‌घाटन करतील आणि नूतनीकरण केलेल्या हॅपी व्हॅली संकुलाचे लोकार्पण करतील.

नवीन अध्यापनशास्त्र आणि अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार 96 वा फाउंडेशन अभ्यासक्रम हा लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीचा पहिला सामुदायिक फाउंडेशन अभ्यासक्रम असून तो मिशन कर्मयोगी या तत्वावर आधारित आहे. या तुकडीत 16 सेवा आणि प्रशासन, पोलिस आणि वन या तीन रॉयल भूतान सेवांमधील प्रशिक्षणार्थी अधिकारी (OT) असे एकूण 488 जण समाविष्ट आहेत.

या तुकडीमधील उत्साह आणि साहसी वृत्तीचा विकास करण्यासाठी आणि संशोधनात्मक दृष्टी व्यापक करण्याच्या हेतूने नवीन अध्यापनशास्त्रातील मिशन कर्मयोगी तत्वज्ञानाधारित अभ्यासक्रमाची रचना केली आहे. प्रशिक्षणार्थ्याला विद्यार्थी वा नागरिकापासून सार्वजनिक सेवक निर्माण करण्यासाठी सबका प्रयास च्या माध्यमातून पद्मविजेत्यांशी चर्चा आणि ग्रामीण भारताची कल्पना येण्यासाठी ग्रामीण भागांना भेटी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दुर्गम भागात किंवा सीमेवर वसलेल्या गावांमधील जनतेला तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांची कल्पना येण्यासाठी प्रशिक्षणार्थींना तिथे नेले जाते. सातत्यपूर्ण ग्रेडेड प्रशिक्षण आणि स्व-अभ्यास यांच्याशी मेळ खाणारा लवचिक दृष्टीकोन अवलंबून येथील अभ्यासक्रम तयार केला आहे.

अभ्यासाचे ओझे असलेला विद्यार्थी ते आरोग्यसंपन्न युवा नागरी सेवक या बदलाला सहकार्य म्हणुन आरोग्य तपासणी, शारिरीक क्षमता चाचणी अशा चाचण्या नियमितपणे केल्या जातात. सर्व 488 अधिकाऱ्यांना अनेक खेळांचेही प्रशिक्षण दिले जाते.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
'Goli unhone chalayi, dhamaka humne kiya': How Indian Army dealt with Pakistani shelling as part of Operation Sindoor

Media Coverage

'Goli unhone chalayi, dhamaka humne kiya': How Indian Army dealt with Pakistani shelling as part of Operation Sindoor
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 मे 2025
May 20, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Vision in Action: Transforming India with Infrastructure and Innovation