पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला दोन महत्वाच्या कार्यक्रमांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित करणार आहेत.
केरळ मधल्या वरकला इथल्या शिवगिरी मठातल्या, 85 व्या शिवगिरी यात्रा समारंभाच्या, उदघाटनपर कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. शिवगिरी हे भारतातले एक महान संत आणि समाज सुधारक, नारायण गुरु यांचे पवित्र वास्तव्यस्थान आहे.
1 जानेवारीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोलकाता इथे, प्रोफेसर एस एन बोस यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित करणार आहेत. प्रोफेसर बोस हे भारतातले भौतिक शास्त्रज्ञ् होते. क्वांटम मेकॅनिक्स मधल्या महान कार्यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे बोस-आईन्स्टाईन सांख्यिकीसाठी पाया घातला गेला. बोस-आईन्स्टाईन सांख्यिकीनुसार आचरण असणाऱ्या कणांच्या वर्गाला बोसन्स असे नाव देण्यात आले आहे.